News Flash

मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणात वाढ

मुंबईत गेल्या वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या ४४७ घटना घडल्या होता.

 

मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या गेल्या वर्षभरात तब्बल ९२२ घटना घडल्या असून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे ४४७  गुन्हे दाखल झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी  उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मुंबईत गेल्या वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या ४४७ घटना घडल्या असून सन २०१४मध्ये हा आकडा ३५० होता. तर अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना गेल्या वर्षभरात ९२२ घडल्या असून सन २०१४मध्ये ही संख्या २७९ होती. झोपडपट्टी भागातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे मान्य करतानाच लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 12:47 am

Web Title: 922 minor girls kidnapped from mumbai last year
Next Stories
1 ‘म्हाडा’मार्फतच बीडीडी चाळींचा पुनर्विकास
2 तरुणीला अश्लील लघुसंदेश पाठविणाऱ्यास अटक
3 संरक्षणाचे साडेपाच कोटींचे भाडे करोडपतींनी थकवले
Just Now!
X