करोना संकट आणि लॉकडाउनमुळे मुंबईतल्या १४ वर्षांच्या मुलावर चहा विकण्याची वेळ आली आहे. हा मुलगा चहा तयार करुन मुंबईतील भेंडी बाजार नागपाडा या ठिकाणी चहा विकतो. “माझं चहाचं दुकान नाही मी चहा तयार करुन भेंडी बाजार, नागपाडा आणि इतर भागांमध्ये विकतो. दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये मिळतात. ते पैसे मी आईला देतो. काही पैशांची बचत करतो” असं या मुलाने ANI ला सांगितलं आहे. करोना संकट आणि लॉकडाउन यामुळे या मुलावर चहा विकण्याची वेळ आली आहे.

“माझे वडील १२ वर्षांपूर्वी वारले. माझ्या बहिणी या ऑनलाइन क्लासेसद्वारे शिक्षण घेत आहेत. शाळा सुरु झाल्या तर  मी पण शाळेत जाऊ शकेन. करोना आणि लॉकडाउन या काळात माझ्या आईचं महिन्याचं उत्पन्न बंद झालं. माझी आई स्कूल बस अटेन्टंडंट आहे. मात्र करोना आणि लॉकडाउन काळात शाळाच बंद आहेत त्यामुळे आईला मिळणारा पगार बंद झाला” असंही या मुलाने सांगितलं आहे.