मुंबईतल्या धारावी भागात ५६ वर्षांच्या एका रुग्णाची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या रुग्णाच्या ७ कुटुंबीयांना जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. अशात आता धारावीत एक करोनाग्रस्त आढळला आहे.
A 56-yr-old man from Dharavi has been found to be #Coronavirus positive. He has been shifted to Sion Hospital. Other 7 members of his family placed under home quarantine. They will be tested tomorrow. The building they live in has been sealed: Brihanmumbai Municipal Corporation https://t.co/DSeDS7jwee
— ANI (@ANI) April 1, 2020
One #Coronavirus positive case has been found in Shahu Nagar of Dharavi in Mumbai. A team of Brihanmumbai Municipal Corporation (BMC) is at the spot. Police is planning to seal the concerned building where the person has been found. More details awaited. pic.twitter.com/3q7ClPqnXG
— ANI (@ANI) April 1, 2020
महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३३५ वर पोहचली आहे. मंगळवारी एकट्या मुंबईत ५९ रुग्ण आढळले होते. आता धारावीतही करोनाग्रस्त आढळला आहे. आजच मुंबईतले १९१ विभाग हे करोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. तरीही मुंबईतली आणि महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते आणखी काही कठोर उपाय योजणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2020 10:09 pm