News Flash

Video: ३१ डिसेंबरच्या रात्री पोलिसांना चहा वाटप करत केलं नवीन वर्षाचं स्वागत

जाणून घ्या 'कप ऑफ स्माइल' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल...

A Cup of Smile

२०१९ हे वर्ष संपलं आणि जगभरामध्ये नवीन वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आलं अनेकांनी ३१ डिसेंबरला आपल्या मित्रांबरोबर किंवा घरच्यांबरोबर सेलिब्रेशन केलं असेल. पण मुंबईमधील काही तरुणांनी थेट पोलिसांबरोबर नवीन वर्षाचे स्वागत केलं आहे. ‘कप ऑफ स्माइल’ या मोहिमेअंतर्गत मागील चार वर्षांपासून मुंबईतील काही तरुण नवीन वर्षाला म्हणजेच ३१ डिसेंबरला आणि गणेशविसर्जनाच्या दिवशी पोलिसांना चहा वाटून हे दिवस त्यांच्याबरोबर साजरे करतात. मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी, मरीन ड्राइव्हबरोबरच हा उपक्रम दादर आणि ठाण्यामध्येही आयोजित केला जातो. जाणून घेऊयात या उपक्रमाबद्दल…

नवीन वर्षाचे स्वागत करण्याची ही कल्पना तुम्हाला कशी वाटले हे कमेंट करुन नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 5:23 pm

Web Title: a cup of smile group of youth welcomes new year with distributing tea to cops scsg 91
Next Stories
1 संजय राऊत उद्धव ठाकरेंवर नाराज? ‘त्या’ फेसबुक पोस्टमुळे रंगली चर्चा
2 मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार
3 एमटीएनएल वाहिनीच्या खड्डय़ात पडून दोन कामगारांचा मृत्यू
Just Now!
X