News Flash

मुंबई: सिद्धिविनायकाला ३५ किलो सोनं केलं दान; किंमत ऐकून थक्क व्हाल

मंदिराच्या २१९ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भक्ताने एवढे दान दिले आहे

सिद्धिविनायक

दिल्लीमधील एका गणेशभक्ताने मुंबईमधील प्रभादेवी येथील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये ३५ किलो सोने दान म्हणून दिले आहे. या सोन्याची किंमत १४ कोटी रुपये इतकी आहे. मंदिराच्या २१९ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भक्ताने एवढ्या रकमेची वस्तू दान म्हणून दिली आहे. १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान शेंदूर लेपणासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दान म्हणून मिळालेल्या या सोन्याचा वापर मंदिराला सुवर्ण झळाळी देण्यासाठी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या सोन्यातूनच मंदिराचा गाभारा, दरवाजा आणि घुमटाला सोन्याचा मुलामा चढवण्यात आल्याचे बांदेकर यांनी सांगितलं. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने दान करणाऱ्या दात्याच्या नावाबद्दल बांदेकरांनी कोणताच खुलासा केलेला नाही.

बांदेकरांनी दिलेल्या माहितीनुसार २०१७ साली मंदिराला एकूण ३२० कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. २०१९ मध्ये या रक्कमेमध्ये ९० कोटींनी वाढ होऊन दान म्हणून मिळालेली एकूण रक्कम ४१० कोटी इतकी झाली. दान म्हणून मिळालेल्या या रक्कमेमधून गरजूंना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. १९ नोव्हेंबर १८०१ मध्ये या मंदिराची स्थापना झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 2:53 pm

Web Title: a devotee donated 35 kg gold worth around rs 14 crores to mumbai shri siddhivinayak temple scsg 91
Next Stories
1 मुंबईतील नेहरु नगर भागात महिलेवर सामूहिक बलात्कार, चारजण अटकेत
2 नाईट लाईफमुळे ‘निर्भया’सारख्या घटना वाढतील – राज पुरोहित
3 मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा
Just Now!
X