21 September 2020

News Flash

पवईतील हिरानंदानी परिसरातील इमारतीला लागलेली आग आटोक्यात

दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

मुंबईतील उच्चभ्रू असलेल्या पवई परिसरातील हिरानंदानी येथील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईतील पवई येथील हिरानंदानी परिसरात असलेल्या डेल्फी नावाच्या इमारतीला सकाळी ६.१५ वाजता आग लागली. या इमारतीत पाचव्या असलेल्या एका कार्यालयाला ही आग लागली. परंतु काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारणं केलं.

दरम्यान, या आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. तसंच दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यथ आलं. ही आग कशामुळे लागली याचा शोध सध्या सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 11:03 am

Web Title: a fire broke out at delphi building in powai at about 6 am no injuries reported jud 87
Next Stories
1 “यंदा गणेशोत्सव नव्हे तर आरोग्योत्सव”; लालबागचा राजाचा ऐतिहासिक निर्णय
2 Video : आशिया खंडातली पहिली कोऑपरेटिव्ह सोसायटी
3 इंधन दरवाढीमुळे प्रवास महाग
Just Now!
X