विक्रोळीच्या नेव्हल डॉकयार्ड वसाहतीमागील जंगलात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपीला अटक केली आहे. हा मृतदेह युसूफ मुल्ला (४५) या रिक्षाचालकाचा होता. समलिंगी संबंधास नकार दिल्याने त्याच्या मित्रानेच हत्या केल्याचे उघड झाले आहे.  पोलिसांनी तपास करून मुल्ला याचा पवई येथे राहणारा मित्र हरीश गोसावी (३७) याला अटक केली. आरोपी आणि मयत मुल्ला यांच्यात सात वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. मात्र मुल्लाने यापुढे संबंध ठेवणार नाही, असे सांगितल्याने हरीशने डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली.