News Flash

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी जंबो मेगा ब्लॉक

वसई ते भाईंदर या स्थानकांदरम्यान जंबो मेगा ब्लॉक

येत्या रविवारी म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत भाईंदर ते वसई रोड या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन  मार्गांवर हा जंबो मेगाब्लॉक  घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. सिग्नल्स, ओव्हरहेड वायर आणि इतर यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

रविवार म्हटलं की मेगाब्लॉक हा घेण्यात येतोच. याआधी मागच्या रविवारी म्हणजेच २६ जानेवारीलाही अशाच प्रकारचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र यावेळी पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर आणि वसई रोड स्टेशन्सदरम्यान जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं आहे. तुम्ही जर भाईंदर आणि वसई या स्थानकांदरम्यान राहात असाल तर रविवरी गरज असेल तरच बाहेर पडा. नाहीतर मेगाब्लॉकचा त्रास तुम्हाला सहन करावा लागू शकतो.

२६ जानेवारीला मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. तर पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. बोरीवली ते राम मंदिर स्थानक या दरम्यान रात्री ११.३० पहाटे ४.३० पर्यंतचा जंबो मेगा ब्लॉक घेण्यात आला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 7:18 pm

Web Title: a jumbo block of four hours will be taken from 11 00 hrs to 15 00 hrs on sunday 2nd february scj 81
Next Stories
1 आजही नथुराम गोडसेची विचारधारा जिवंत आहे – नवाब मलिक
2 राज ठाकरेंचे विद्युत आयोगाला पत्र, BEST च्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप
3 नोंदणीकृत करारनामा नसल्यास विलंबासाठी व्याज मिळणे कठीण
Just Now!
X