मुंबईतल्या मालाड भागात भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे सात बंब आणि चार मोठे पाण्याचे टँकर दाखल झाले आहेत. तसंच रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली आहे. ही लेव्हल २ ची आग असल्याचं अग्निशमन दलाने स्पष्ट केलं आहे. मालाडमधील त्रिवेणी नगर भागात ही आग लागली आहे. संध्याकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी ही आग लागली. त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दलाचे सात बंब दाखल झाले आहेत. ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आग नियंत्रणात आणण्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी का लागली ते अद्याप समोर आलेलं नाही. संध्याकाळी ६. ५१ च्या सुमारास ही आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट यामुळे हा परिसर वेढला गेला. अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाही. तसंच या घटनेत कुणीही जखमी झाल्याचं वृत्तही अद्याप समोर आलेलं नाही.