23 September 2020

News Flash

अंधेरीतील रोल्टा कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या ८ गाड्या घटनास्थळी

ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

अंधेरी : सिप्झ एमआयडीसीतील रोल्टा टेक्नॉलॉजीजला गुरुवारी भीषण आग लागली.

अंधेरी पूर्वमधील सिप्झ एमआयडीमधील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला गुरुवारी भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. ही आग लेवर ३ प्रकारची असल्याचे सुरुवातीला अग्निशमन दलाने सांगितले होते. मात्र, आता ही आग आणखीनच भडकली आहे. त्यामुळे अग्निशमनदल युद्धपातळीवर आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

थर्मल इमॅजीन कॅमेरॅच्या मदतीने आग नेमकी कुठे लागलीय याचा शोध घेऊन ती विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुपारीच्या १च्या सुमारास ही आग नियंत्रणात येईल असे वाटत होते. सध्या ही आग आणखीनच भडकत चालली आहे. सकाळी साडेअकरा वाजता शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे कंपनीतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

ही इमारत संपूर्ण काचेची इमारत असल्याने यामध्ये हवा खेळती राहत नसल्याने प्रचंड धूर आणि आगीचे लोळ उठत असल्याने आग विझवण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, या इमारतीची वीज बंद करण्यात आली आहे. सुदैवानं या इमारतीत कोणताही कर्मचारी अडकलेला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 2:09 pm

Web Title: a level iii fire has broken out at rolta company in andheri east 8 fire tenders are present at the spot aau 85
Next Stories
1 मुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा मोर्चा
2 राज्यात ‘एनपीआर’ १ मेपासून
3 ‘कोमसाप’च्या कारभाराला कलहाचा कलंक
Just Now!
X