News Flash

काशिमीरा येथे अल्पवयीन मुलीवर निकटवर्तीयाकडून लैंगिक अत्याचार

काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली.

नऊ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर शिक्षकांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच काशिमीरा येथे एका दहा वर्षीय मुलीवर तिच्या निकटवर्तीयाकडूनच लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला १९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी पीडित मुलीच्या आईसोबत गेल्या काही महिन्यांपासून लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता.
मुलीच्या आईला कामानिमित्त गावाला जायचे असल्याने तिने मुलीला आरोपीच्या हाती देखभालीसाठी सोपवले. मात्र या संधीचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीने हे कृत्य करीत असताना आरोपीला पकडल्यावर आरोपीने तेथून पलायन केले. काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2015 6:04 am

Web Title: a minor girl saxually asulted by family member in kashimira
Next Stories
1 ‘मिलीबग’ कीटकांपासून मरणाऱ्या झाडांसाठी तातडीने उपाययोजना करा!
2 महागडय़ा सौरपंप खरेदीत गरव्यवहार?
3 भाजपचा मुंबईत शिवसेनेला पाठिंबा
Just Now!
X