08 March 2021

News Flash

वडाळा येथे मिथेनॉल टँकरला भीषण आग, चालकाचा होरपळून मृत्यू

ही घटना रात्री १०.४५ च्या सुमारास आयमॅक्स सिनेमाजवळ घडली. टँकर पलटी झाल्यानंतर अचानक आग लागली व बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले.

मुंबईतील वडाळा येथे पेट्रोल टँकरला भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. (छायाचित्र: एएनआय)

मुंबईतील वडाळा येथे मिथेनॉल घेऊन जात असलेल्या टँकरचा अपघात होऊन भीषण आग लागल्याने एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री १०.४५ च्या सुमारास आयमॅक्स सिनेमाजवळ घडली. टँकर उलटल्यानंतर अचानक आग लागली व बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत टँकर चालकाचा मृत्यू झाला. प्रताप असे टँकर चालकाचे नाव असल्याचे सांगण्यात येते. आग विझविण्यासाठी घटनास्थळी आगीचे ५ बंब रवाना झाले. मिथेनॉलच्या टँकरला आग लागल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. रात्री उशिरा आग विझविण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Express photo by Prashant Nadkar, Monday, 26th November 2018, Mumbai

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात नॅशनल कॅरियर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या टँकरने (एमएच ४३ वाय २७३३) मागून धडक दिली. धडकेमुळे टँकर उलटला आणि अचानक पेट घेतला. यात टँकरचालक प्रताप (वय ५०) याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काटकर यांनी दिली.

टँकरमध्ये मिथेनॉल होते. आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो होतो. तेव्हा टँकरने पेट घेतला होता. टँकर चालकाचा मृत्यू झाला होता. आता परिस्थिती नियंत्रणात असे, अग्निशमन अधिकारी ए एच सावंत यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 12:22 am

Web Title: a petrol tanker caught fire near mumbais wadala 5 fire tenders present at the spot
Next Stories
1 दहशतवाद संपवण्यासाठी एकसंध राहणं आवश्यक-मुख्यमंत्री
2 सगळे भारतीय एकवटले तर शत्रूला तोडीस तोड उत्तर देऊ शकतात-अमिताभ बच्चन
3 दहा वर्षात मुंबईत ४९ हजार आगीच्या घटना, ६०९ जणांचा बळी
Just Now!
X