15 October 2019

News Flash

मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी

धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचं नाव होतं

दक्षिण मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. लोकमान्य टिळक मार्गावर असणाऱ्या अहमद इमारतीचा भाग कोसळला आहे. सकाळी ११ वाजता इमारतीचा हा भाग कोसळला असल्याची माहिती असून माहिती मिळताच अग्मिशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचं नाव होतं. काही दिवसांपूर्वी इमारतीतील रहिवाशांना तेथून हलवण्यात आलं होतं. यामुळे सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान इमारतीच्या खाली असणाऱ्या काही दुकांनांचं मात्र खूप नुकसान झालं आहे. इमारतीचा भाग कोसळल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मलबा हटवण्याचं काम सुरु आहे.

First Published on September 20, 2019 12:00 pm

Web Title: a portion of building at lokmanya tilak road collapse sgy 87