सचिन तेंडुलकर यांचे गुरु आणि क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का करण्यात आले नाहीत? असा सवाल आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्याच्याच तोडीचे एकाहून एक उत्तम क्रिकेटपटू आचरेकरसरांनी घडवले. त्यांना पद्मश्री हा किताबही देण्यात आला होता. असं असतानाही त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का केले नाहीत? याचं उत्तर सरकारने द्यावं असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे ट्विट केले आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि त्याच तोडीचे एकाहून एक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे रमाकांत आचरेकर सर ‘पण’ पद्मश्री होते मग त्यांचे अंत्यसंस्कार सरकारी इतमामात का नाही झाले? सरकारने ह्याचं उत्तर द्यायलाच हवं. #RamakantAcharekar हे ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.

आचरेकर सरांच्या कुटुंबीयांशी बोलून सरांच्या नावाने एकादी संस्था सुरू करू असं सांगत क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्याचे क्रीडामंत्री काहीही म्हणत असले तरी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनी मात्र सरकारी यंत्रणांमध्ये विसंवाद झाल्याचं मान्य केलं आणि दिलगिरी व्यक्त केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A recipient of the padmashri award and yet the state government chose not to honour him with a state funeral
First published on: 03-01-2019 at 20:49 IST