News Flash

हॉटेल व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न; छोटा राजन दोषी

मुंबईतील विशेष न्यायालयाचा निकाल

मुंबईतील विशेष न्यायालयाने हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह सहा जणांना दोषी ठरवले आहे.छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने  हा निर्णय दिला आहे. न्यायालयाने याप्रकरणी आठ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच या सहाही आरोपींना प्रत्येकी पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

गुन्हेगारी षडयंत्र रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न व २०१२ मध्ये हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवले गेले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने १३३२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर २०१२ मध्ये गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या व हल्लेखोर फरार झाले होते. तर शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र तरीही त्यांनी जवळील पोलीस ठाणे गाठले होते व त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जानेवारी २०१३ मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात छोटा राजनच्या सुचनेवरूनच शेट्टींना गोळी मारण्यात आल्याचे म्हटले होते. छोटा राजन यास २०१५ मध्ये बाली येथून अटक करून भारतात आणले गेले आहे. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरूंगात आहे. त्याला मागील वर्षीच पत्रकार जे डे हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 3:54 pm

Web Title: a special court in mumbai convicts chhota rajan for attempt to murder of hotelier br shetty msr 87
Next Stories
1 मनसे कार्यकर्ते शांतपणे ईडी कार्यालयात जाणार-बाळा नांदगावकर
2 राज ठाकरेंचे भागीदार राजन शिरोडकर ईडी कार्यालयात दाखल; उन्मेष जोशींसोबत एकत्र चौकशी सुरु
3 खय्याम यांचे देहावसान
Just Now!
X