News Flash

ब्रेन ट्युमर झालेल्या तरुणाला मिळाली आश्चर्यकारक नवसंजीवनी

डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे २९ वर्षीय तरूण वाचला

परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ब्रेन ट्युमर झालेल्या २९ वर्षीय तरूणावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. गणेश भोर असे त्या तरूणाचे नाव आहे. डॉक्टरांनी वेळीच उपचार केल्यामुळे तरूणाला आश्चर्यकारक नवसंजीवनी मिळाली. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने गणेश भोर या २९ वर्षीय तरुणावर एक अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून ब्रेम ट्युमर काढला. गणेश मोरे या तरूणाला बेशुद्धावस्थेत (जवळजवळ ब्रेन डेड स्थितीतील) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्रेन ट्युमरमुळे होणारा अॅक्युट हायड्रोसेफॅलस ( या आजारामध्ये सेरब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ) मेंदूमध्ये निर्माण होते.) असल्याचे निदान झाले. न्यूरो विभागाने वेळेवर उपचार केल्याने या तरुणाला नवसंजीवनी मिळाली.

गणेश भोर यांना गेल्या अनेक दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास जाणवत होता आणि त्यामुळे त्यांना काम किंवा इतर कोणत्याही दैनंदिन क्रिया करणे अशक्य होत होते. २२ मार्च रोजी ते बेशुद्ध झाले आणि त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे सीटी स्कॅन केल्यावर दिसून आले की, त्यांच्या मेंदूमधील रक्तवाहिन्यांमध्ये अतिरिक्त द्रव जमा झाले आहे. यामुळे मेंदूतील द्रवावर अतिरिक्त दाब निर्माण होतो. या परिस्थितीला अॅक्युट हायड्रेसेफेलस म्हणतात. रुग्णाला इनट्युबेट करण्यात येऊन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर एमआरआय चाचणी करण्यात आली. त्यात दिसून आले की, मेंदूच्या केंद्रावर कोलॉइड सिस्ट (पुळीसारखा प्रकार) दिसून आले, त्यावर लगेच उपचार करणे आवश्यक होते. म्हणूनच डॉ. नितीन डांगे आणि डॉ. पंकज अगरवाल यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

ग्लोबल हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे म्हणाले, “कॅज्युअल्टीमध्ये इमर्जन्सी व्हेन्ट्रिक्युलर टॅप तयार करण्यात आला. त्याने नॉन कम्युनिकेटिंग हायड्रोसेफेलसमधील (रक्तवाहिन्यांना जोडणाऱ्या मार्गात निर्माण होणारा अडथळा) सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा निचरा केला. त्यानंतर दाब कमी झाला आणि रुग्ण शुद्धीवर आला. त्यानंतर व्हेन्ट्रिक्युलोपेरिटोनिअल शंट करण्यात आले (या शस्त्रक्रियेमध्ये मेंदूतील (हायड्रोसेफेलस) पोकळीमधील (रक्तवाहिन्या) सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचा निचरा करण्यात येतो), त्याचप्रमाणे सीएसएफच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे अर्बुद (पुळी) मायक्रोसर्जरी करून काढून टाकण्यात आली. या पुळीमुळे दाब वाढत होता, परिणामी सीएसएफ मेंदूतून बाहेर जाऊ शकत नव्हते. ते मेंदूतच राहिल्याने मेंदूतील दाब वाढला आणि तो बेशुद्ध झाला. शस्त्रक्रियेच्या चौथ्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. १२ दिवसांनी रुग्ण फॉलो-अपसाठी आला होता आणि त्यांचे टाके काढण्यात आले. त्यांची प्रकृती आता सामान्य झाली आहे आणि त्यांची दिनचर्याही सामान्य झाली आहे.

गणेश भोर म्हणाले, “डॉ. नितीन डांगे आणि पंकज अगरवाल यांनी वेळेवर घेतलेल्या निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्यामुळे माझा नवे आयुष्य मिळाले. या प्रसंगाला आता एक महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला आहे आणि मी आता एकदम व्यवस्थित आहे आणि हिंडू-फिरू शकत आहे. माझे कुटुंबीयसुद्धा आता खुश आहेत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 5:24 pm

Web Title: a timely intervention by doctors at global hospital saved 29 year old patient from an acute hydrocephalus
Next Stories
1 महात्मा गांधींवरील ट्विट भोवलं, IAS निधी चौधरींची बदली
2 तब्बल ५६ वर्षांनी ते शाळेत आले एकत्र, मराठी शाळेसाठी निधी उभारण्याचा निर्धार
3 विनाहेल्मेट प्रवास जीवघेणा
Just Now!
X