News Flash

VIDEO: विक्रोळीत मंगळसूत्र ओढून महिलेची ट्रॅकवर उडी

पोलिसांनी या चोर महिलेला अटक केली असून सीता सोनवानी असं तिचं नाव आहे

विक्रोळीत एका चोर महिलेने मंगळसूत्र चोरलं असल्याची घटना समोर आली आहे. मंगळसूत्र खेचल्यानंतर आपल्याला कोणीही पकडू नये म्हणून महिलेने थेट उलट्या दिशेला रुळांवर उडी मारली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी या चोर महिलेला अटक केली आहे. सीता सोनवानी असं या महिलेचं नाव आहे.

मध्य रेल्वेवरील विक्रोळी स्थानकात हा प्रकार घडला आहे. ही महिला सीएसएमटी – कल्याण लोकलमध्ये प्रवास करत होती. लोकल विक्रोळी स्थानकात पोहोचताच तिने एका महिलेचं मंगळसूत्र ओढलं आणि थेट ट्रॅकवर उडी मारली. सुदैवाने त्यावेळी विरुद्ध दिशेने कोणतीही लोकल जात नव्हती. अन्यथा महिला थेट रेल्वेखाली आली असती.

सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे महिलेने उडी मारल्यानंतर समोरील फलाटावरुन पळ काढला. कुर्ला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत महिलेला अटक केली आहे. कळवा येथून महिलेला अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:55 pm

Web Title: a woman snatch mangalsutra in local train and jumps on track
Next Stories
1 धक्कादायक! गरबा खेळून घरी परतणाऱ्या ११ वर्षाच्या मुलीवर मुंबईत बलात्कार
2 तुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू – उद्धव
3 गौतम नवलखा पोलिसांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात 
Just Now!
X