News Flash

महिलांवर चिकट पदार्थ टाकणारा तरुण ताब्यात; मजेसाठी करत होता कृत्य

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने दोन महिन्यांत सहा महिलांच्या अंगावर अशा प्रकारे चिकट पदार्थ टाकला आहे.

मुंबईत रेल्वे ब्रीजवरुन महिलांच्या अंगावर चिकट पदार्थ टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अंधेरी ब्रिजवर उभे राहून केवळ गंमत आणि मजेसाठी तरुणी किंवा महिलांच्या अंगावर चिकट पदार्थ टाकून पळून जाण्याऱ्या तरुणाचा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायलयात नेले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने दोन महिन्यांत सहा महिलांच्या अंगावर अशा प्रकारे चिकट पदार्थ टाकला आहे.

रामवीर रामरूप चौधरी असे या तरुणाचे नाव आहे. तो पदवीधर असून मुळचा उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्याचा रहिवाशी आहे. त्याने आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. अंधेरी परिसरात राहणारी एक महिला शुक्रवारी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अंधेरी ब्रिजवरून जात असताना तिच्या अंगावर चिकट पदार्थ फेकण्याच्या तयारीत असणाऱ्या रामवीरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी रंगेहात अटक केली. त्यानंतर अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भादंवि ३२४ आणि ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी रामवीर हा मित्रांसोबत साकीनाका येथील चांदवली परिसरात राहतो. तो लोअर परेल येथे एका फर्निचरच्या दुकानात कामाला होता. त्याला महिलांच्या अंगावर चिकट पदार्थ फेकण्याची विकृती जडली होती. अंधेरी रेल्वे ब्रिज तसेच मेट्रो ब्रिज वरून जाणाऱ्या महिलांच्या अंगावर चिकट पदार्थ टाकून रामवीर पळून जायचा अशा प्रकारे त्याने अंधेरी, मेट्रो ब्रिज आणि बोरीवली ब्रिज या ठिकाणी सहा महिलांच्या अंगावर चिकट पदार्थ टाकल्याची कबुली दिली.

यासंबंधी एका तरुणीने अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दाखल घेत पोलिसांनी शुक्रवारी पाळत ठेवली. गुरुवारच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन पोलीस आरोपीच्या शोधात होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे रामवीर आला आणि त्याने एका महिलेच्या अंगावर चिकट पदार्थ टाकण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले. यानंतर इतर गुन्ह्यांच्या चौकशीसाठी अंधेरी आणि बोरीवली रेल्वे पोलीस रामवीर याचा ताबा घेणार आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 10:18 pm

Web Title: a youth arrested for a sticky substance throw on women graduate youth glory for fun
Next Stories
1 मराठा आरक्षणविरोधी याचिका फेटाळण्याची विनंती; सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
2 मुंबईत मंत्रालयाच्या दारातच एका महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
3 ‘शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही ‘पटकून’ टाका’; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका
Just Now!
X