शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. निवडणूक लढवणारे आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आहेत. शिवसेनेचा वरचष्मा असलेल्या वरळी मतदारसंघातून आदित्य निवडणूक लढवत असून, त्यामुळे ते सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आदित्य ठाकरे हे जिंकणारच असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. इतर पक्षांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या वरळी मतदारसंघातील लोकांना बोलत करत त्यांची मते ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने जाणून घेतली. आदित्य ठाकरेंविषयी वरळीकरांच्या मनात नेमकं काय आहे, याचा हा वृत्तांत.

व्हिडीओ इथे पहा –