भामला फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या मॅन्ग्रोव्हजसाठीच्या मोहीमेत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. आदित्य ठाकरे म्हणाले की, ”राज्य सरकारमध्ये एक आवाज पर्यावरणप्रेमींचा आहे. त्यामुळे चिंता करायची गरज नाही.”

प्लास्टिकमुक्तीच्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा मॅन्ग्रोव्हजमधून काढण्यात आला आहे. या मोहिमेत सहभागी होत आदित्य ठाकरे यांनी काही काळ प्लास्टिक/कचरा जमा करण्यास मदतही केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, ”आपण वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही नुसतं बोलून थांबणार नाही. काम करणार आहोत. ”

आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले की, ”मेट्रोचं काम जोरात सुरू आहे. हे काम वेळेत पूर्ण होईल. आपल्याला झाडं कापायची नव्हती. ती आता कापली गेली आहेत. आता आंदोलनकर्त्या मुलांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. पर्यावरणप्रेमींचा आवाज आपण पुढे नेला पाहिजे.”

आसिफ भामला यांच्या भामला फाउंडेशनच्या वतीने कार्टर रोड बीचवर मॅन्ग्रोव्हजमध्ये स्वच्छता मोहीम राबण्यात आली. या कार्यक्रमात अभिनेत्री ईशा गुप्ताही सहभागी झाली होती.