सत्यमेव जयते कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत करण्यात येणारी ‘ह्य़ुमॅनिटी ट्रस्ट’ ही संस्था विशिष्ट धर्माशी संबंधित नसून ती एका खेडेगावात सामाजिक काम करते. मात्र काही जण हेतुपुरस्सर या कार्यक्रमाबाबत चुकीचा संदेश पसरवत असल्याबाबत नाराजी व्यक्त करीत आमीर खान याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच शनिवारी मुंबईते पोलीस सहआयुक्त सदानंद दाते यांची भेट घेतली.
‘आमीर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमामागचे सत्य जाणून घ्या.. आमीरच्या या कार्यक्रमामार्फत मदत करण्यात येणारी सेवाभावी संस्था ही एका विशिष्ट धार्मिक गटाला मदत करणारी आहे..’ अशा प्रकारचा संदेश गेले काही दिवस व्हॉट्सअॅप आणि तत्सम संकेतस्थळांवर फिरत असल्यामुळे खुद्द आमीर खानला धक्का बसला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2014 4:24 am