22 May 2018

News Flash

देशात लोकशाहीच नाही तर तिची हत्या कशी होणार: संजय राऊत

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी बहुमत सिद्ध करणे त्यांना कठीण जाणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांना सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले आहे.

शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत

लोकशाहीची हत्या झाल्याची टीका केली जात आहे. पण जेव्हा देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही तर तिची हत्या कशी होईल, असा उपहासात्मक सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मध्यरात्री भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यानंतर आज सकाळी येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएस ऐवजी भाजपाला निमंत्रण दिल्याने या निर्णयावर देशभरातून टीका होताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी बहुमत सिद्ध करणे त्यांना कठीण जाणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांना राज्यपालांनी सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले आहे. लोकशाहीची हत्या झाल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. पण जेव्हा देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही तर तिची हत्या कशी होईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारची पुन्हा हातचलाखी : उद्धव ठाकरे

राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्याने काँग्रेस-जेडीएस आघाडीने या निर्णयावर टीका केली. त्यांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस-जेडीएस हे बेंगळुरूत आंदोलन करत आहेत. भाजपाने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, पेट्रोल दरवाढीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला. कर्नाटक निवडणुकीपुरते केंद्र सरकारच्या सांगण्यावरून पेट्रोलची दरवाढ रोखली होती. आता निकाल लागताच पुन्हा दरवाढीचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसवल्याचा आरोप केला. कर्नाटकातील निवडणूक संपल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा ‘हातचलाखी’चा प्रयोग केला असल्याचा टोलाही शिवसेनेने लगावला.

First Published on May 17, 2018 11:58 am

Web Title: ab desh mein loktantra bacha hi nahi hai toh hatya kiski hogi says shiv sena leader mp sanjay raut
 1. Gurudatta Joshi
  May 18, 2018 at 6:00 pm
  हा कुत्रा कधीपासून भुंकतोय पण सिंह स्वतःचीच चाल चालतोय बेडरतेने .... हे सगळे दादर स्टेशन वर लॉटरीचे तिकीट विकताना दिसतील भविष्यात .... कर्नाटक च्या अनुभवावरून तरी गु खाऊ नका राव... मराठी माणसाच्या अस्मितेची न शिवरायांच्या पुण्याईची लाज जरा तरी बाळगा !! मूर्ख कुठचे ?
  Reply
  1. Udaypadhye Shankar
   May 17, 2018 at 5:07 pm
   देशात लोकशाही आहे म्हणूनच राऊत आणि ठाकरे ' भरकटल्यासारखे ' बोलू शकतात. आणि पेट्रोल-डिझेलचे दर वाढले म्हणून लोकांनी वाहने चालवायची कमी / बंद केली का हे जरा राऊतांनी साधार सांगावे.
   Reply
   1. Sanjay Khetle
    May 17, 2018 at 4:40 pm
    राऊत साहेब, देशात लोकशाही नसती तर तुम्ही कधीच तुरुंगात खिजत पडले असतात. केंद्र आणि राज्य सरकार मधून आधी बाहेर पद आणि नंतर बडबड करा. स्वतः एकदा तरी जनतेतून निवडून येऊन दाखवा? उद्धव ठाकरेंची चमचेगिरी करून अजून किती आयुष्य काढणार?
    Reply
    1. Ash Ara
     May 17, 2018 at 3:54 pm
     शिवसेनेचे केंद्रातील आणि राज्यातील मंत्री काय झाक मारत आहेत? लोकशाही नाही तर तुमच्या साहेबाचे पाय दाबायला त्यांना मातोश्रीवर बोलावून घ्या .
     Reply
     1. Dr. Vijay Raybagkar
      May 17, 2018 at 12:55 pm
      एवढा निर्लज्ज माणूस मी गेल्या १०००० वर्षात बघितला नव्हता अशी प्रतिक्रिया अशा वेळी आचार्य अत्रे यांनी नक्कीच दिली असती. महाराष्ट्रातील जनता शिवसेनेला पुढील निवडणुकीत या कर्तृत्वहीन,कृतघ्न वाचाळपणाचा जाब विचारेल याची आता ा अजिबात शंका वाटत नाही.
      Reply
      1. Sanjay Khetle
       May 17, 2018 at 12:50 pm
       लोकशाही नाही तर तुम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये काय करताय. देवाने जीभ दिली आहे तिचा कसाही वापर करू नये. आणि तुला तर जनतेमध्येही कोणी विचारात नाही. उगाच आपली फुकाची बडबड करू नये. कंटाळा आला तुमच्या त्याच त्याच वायफळ बडबडीचा.
       Reply
       1. Load More Comments