06 August 2020

News Flash

माफीबाबत अद्याप निर्णय नाही – गोविंदा

सात वर्षांपूर्वी चाहत्याला मारलेली थप्पड अभिनेता गोविंदा याला भोवली आहे.

सात वर्षांपूर्वी चाहत्याला मारलेली थप्पड अभिनेता गोविंदा याला भोवली आहे. या थप्पड प्रकरणी गोविंदाने सदर चाहत्याची माफी मागावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सध्याोाध्यमांपासून दूर असलेल्या गोविंदाने मंगळवारी निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो, असे गोविंदाने सांगितले असले तरी न्यायालयाच्या आदेशानुसार त्या चाहत्याची माफी मागायची की नाही, याचा निर्णय घेतला नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

चित्रपटाच्या सेटवर गोविंदाने संतोष रायला थप्पड मारली होती. या कृतीने दुखावलेल्या संतोषने या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. अभिनेता म्हणून गोविंदा सगळ्यांना आवडतो, पण म्हणून पडद्यावर तो जसे वागतो तसे त्याने प्रत्यक्ष आयुष्यात वागू नये, अशी तंबी देत न्यायालयाने दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2015 5:47 am

Web Title: about pardon has not yet decided govinda
टॅग Govinda
Next Stories
1 महापरिनिर्वाण दिनानिमित्त  मध्य रेल्वेची विशेष लोकल सेवा
2 प्रवासी जागरूकतेसाठी आता मोठी मोहीम..
3 तूरडाळीवरून मनसेचे मंत्रालयात आंदोलन
Just Now!
X