News Flash

लग्नाळू डॉन अबू सालेमच्या आयुष्यात ‘बहार’ नाही, सुट्टीचा अर्ज नामंजूर

कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल तुरुंग प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुळे अबू सालेमच्या निकाह म्हणजेच लग्नाच्या मनसुब्यांवर बोळा फिरला आहे.

कुख्यात गुंड अबू सालेम. (संग्रहित)

कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल तुरुंग प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुळे अबू सालेमच्या निकाह म्हणजेच लग्नाच्या मनसुब्यांवर बोळा फिरला आहे. डॉन अबू सालेम आणि अभिनेत्री मोनिका बेदी यांची प्रेमकहाणी सगळ्यांना सर्वश्रुत होती. मात्र मोनिका बेदीशी प्रेमसंबंध संपुष्टात आल्यावर त्याच्या आयुष्यात कौसर बहार ही २७ वर्षीय तरूणी आली. तिच्यासोबत लग्न करण्यासाठी डॉन अबू सालेमने ४५ दिवस तुरुंगवासापासून सुट्टी द्या असे म्हणत पॅरोलचा अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. अबू आणि कौसर बहार यांच्या निकाहसाठी ५ मे ही तारीखही निश्चित करण्यात आल्याचे समोर आले होते. मात्र सुट्टीच नाकारल्याने सध्या तरी अबू सालेमच्या आयुष्यात बहार येणार नाही हे नक्की.

मुंबईतील ९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेमचा हात आहे. तसेच खंडणी, हत्या यांसारखी प्रकरणेही त्याच्याविरोधात सुरु आहेत. मोनिका बेदी या अभिनेत्रीसोबत असलेले त्यांचे प्रेमसंबंधही जगाने जवळून पाहिले आहेत. आता हाच कुख्यात डॉन निकाह करण्यासाठी सुट्टी मागितली. १९९३ च्या स्फोट प्रकरणातील सहभागासाठी टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नवी मुंबईतील तळोजा या ठिकाणी असलेल्या तुरुंगात तो शिक्षा भोगतो आहे. मी अबू सालेमचा आवाज ऐकूनच त्याच्या प्रेमात पडले असे मोनिका बेदीने म्हटले होते. तसेच मोनिका बेदीला चित्रपट मिळवून देण्यातही अबू सालेमचा मोठा हात होता. ‘जानम समझा करो’, ‘जोडी नंबर १’ या सिनेमांमधील भूमिका मिळवून देण्यात अबू सालेमने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र अटक झाल्यानंतर आपण अबू सालेमला कधीही भेटलो नाही असे मोनिकाने सांगितले.

मोनिका बेदीसोबतचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यावर आता अबू सालेमच्या आयुष्यात कौसर बहार नावाची २७ वर्षांची तरुणी आली. तिच्याशी निकाह करायचा असल्याने अबू सालेमने ४५ दिवसांच्या रजेचा अर्ज केला मात्र तो फेटाळण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 12:49 pm

Web Title: abu salems marriage with sayed bahar kausar on hold parole plea rejected
Next Stories
1 कठुआ बलात्कार: पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल
2 सुरत बलात्कार : पीडिता आणि तिच्या आईला नराधमाने ३५ हजारात खरेदी केल्याचे वास्तव समोर
3 ‘सोनिया असो की प्रियंका गांधी, २०१९ ला रायबरेलीतून कोणीही निवडून येणार नाही’
Just Now!
X