News Flash

वातानुकूलित डबलडेकर प्रवाशांच्या सेवेत

आठवडय़ातून तीन दिवस ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव या मार्गावर धावणार आहे.

प्रवासी आरक्षणप्रणालीत समावेश न झाल्याने दोन दिवस यार्डात अडकून असलेल्या वातानुकूलित डबलडेकरचा कोकणातला मार्ग मोकळा झाला आहे.

* आठवडय़ातून तीन दिवस फेऱ्या * प्रवासी आरक्षणप्रणालीत रेल्वेगाडीचा समावेश
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा कंदील दाखवूनही केवळ प्रवासी आरक्षणप्रणालीत समावेश न झाल्याने दोन दिवस यार्डात अडकून असलेल्या वातानुकूलित डबलडेकरचा कोकणातला मार्ग मोकळा झाला आहे. ही गाडी बुधवार, ९ डिसेंबरपासून नियमित सेवेत येणार असून आठवडय़ातून तीन दिवस ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव या मार्गावर धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसहून मडगावपर्यंत या गाडीचे तिकीट फक्त ८३५ रुपये एवढे असेल.
मुंबईहून कोकणात जाण्यासाठी वातानुकूलित डबलडेकर गाडीची प्रतीक्षा कोकणवासीयांना गेल्या वर्षांपासूनच होती. गणेशोत्सवात ही गाडी अवाजवी दरांत चालवल्याबद्दल कोकणवासींना नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता रेल्वेने ही गाडी कोकण रेल्वेमार्गावर नियमित स्वरूपात चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
११०८५ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव ही गाडी आठवडय़ातील रविवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी मुंबईहून सकाळी ५.३० वाजता रवाना होईल. ही गाडी ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थिविम, करमाळी या स्थानकांवर थांबून संध्याकाळी ५.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. तर, ११०८६ अप मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी आठवडय़ातील सोमवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी मडगावहून सकाळी ६.०० वाजता निघून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे संध्याकाळी ५.१० वाजता पोहोचेल.

असे असतील तिकिट दर
प्रवासाचा टप्पा दर ’एलटीटी-चिपळूण ४४०
* एलटीटी-रत्नागिरी          ५४०
* एलटीटी-कणकवली        ७००
* एलटीटी-सावंतवाडी        ७५०
* एलटीटी-मडगाव            ८३५
* ठाणे-चिपळूण                ४२५
* ठाणे-रत्नागिरी              ५२०
* ठाणे-कणकवली            ६८५
* ठाणे-सावंतवाडी            ७४०
* ठाणे-मडगाव                ८२५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:11 am

Web Title: ac double decker train enter in passenger service for konkan
Next Stories
1 ‘सीएसटी’लाही लोकल फलाटावर!
2 लोकलवर दगडफेक सुरूच
3 भारतीयांची टिवटिव..
Just Now!
X