08 March 2021

News Flash

रेल्वे अर्थसंकल्प २०१३ : मुंबईत धावणार एसी लोकल

मुंबईतील लोकलवरील प्रवाशांचा वाढता भार लक्षात घेता मुंबईत लोकलच्या ७२ नव्या फे-या सुरू करण्यार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी आज संसदेत केली. विशेष म्हणजे

| February 26, 2013 01:53 am

मुंबईतील लोकलवरील प्रवाशांचा वाढता भार लक्षात घेता मुंबईत लोकलच्या ७२ नव्या फे-या सुरू करण्यार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी आज संसदेत केली. विशेष म्हणजे गेली काही वर्ष वारंवार होणारी एसी लोकलची मागणीही यावर्षी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता दिसत आहे. मुंबई लोकलमध्ये एसी कोच बसवणार असल्याचे बन्सल यांनी रेल्वे अर्थसंकल्पात म्हटले आहे.
रेल्वे मंत्रालयाने यावर्षी २१ जानेवारीला रेल्वे भाड्यात वाढ केली होती. त्यामुळे तूर्तास रेल्वे प्रवासात भाडेवाढ करण्यात आलेली नाही. मात्र, येत्या वर्षात ३२ हजार ५० कोटी रूपये प्रवास भाड्यातून मिळवण्याचे लक्ष्य रेल्वेने ठेवले असल्याने लोकलने प्रवास करणा-या प्रवाशांनाही याचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो, त्यानुसार वर्षभरात केव्हाही ही वाढ होऊ शकते असे दिसते.
मुंबईची मध्य रेल्वे सतत होणा-या बिघाडामुळे नेहमीच चर्चेत असते. बाहेरून येणा-या गाड्या आणि लोकल यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक ऐन गर्दीच्यावेळी नेहमी कोसळते. मात्र, कर्जत आणि कल्याणमध्ये तिसरी लाइन टाकणार असल्याचे जाहीर करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न रेल्वे अर्थसंकल्पात केला असल्य़ाचे दिसते.
सुरक्षेच्या दृष्टीनेही मुंबईसाठी चांगली बातमी आहे. महिला विशेष गाड्यांमध्ये रेल्वेच्या महिला कॉन्स्टेबल तैनात करण्यावर भर असेल, असं बन्सल म्हणाले.
ज्य़ेष्ठ नागरिकांसाठी मोठ्या ४०० स्थानकांवर सरकते जीने लावण्यात येणार आहेत त्याचा फायदा मुंबईला मिळणार का हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. पण तसे झाल्यास मोठ्या स्थानकांवरील इतर सोय़ी-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 1:53 am

Web Title: ac local for mumbai
Next Stories
1 रेल्वे प्रवास महागणार!
2 ‘लोकाधिकार’ विरुद्ध ‘जनाधिकार’!
3 वजनदार नेत्यांवर शरसंधान..
Just Now!
X