19 January 2021

News Flash

नांदेडमध्ये लग्नाचे वहाऱ्ड घेऊन जाणाऱ्या गाडीला भीषण अपघात, ११ ठार, २५ जखमी

लातूर-नांदेड रस्त्यावर लग्नाच्या वहाऱ्डाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र

लातूर-नांदेड रस्त्यावर लग्नाच्या वहाऱ्डाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. शिरुर ताजबंद ते मुखेड रस्त्यावर आयशर टेम्पो आणि टँकरची समोरासमोर धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता कि आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व मृत औसा तालुक्यातील खरोसा येथील रहिवासी आहेत.

विवाहसोहळयावरुन परतताना कारला भीषण अपघात
दिवसभरातील हा दुसरा भीषण अपघात आहे. जळगाव-धुळे मार्गावर शनिवारी पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विवाहसोहळा आटोपून कुटुंब परतीच्या वाटेवर असताना हा दुर्देवी अपघात झाला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पारोळ तालुक्यातील दळवेल गावाजवळ ट्रक आणि कारची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती कि, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कारच्या पुढच्या बाजूचा चेंदामेंदा झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2018 10:54 am

Web Title: accident of marriage party in nanded
टॅग Nanded
Next Stories
1 …तर औरंगाबादमध्ये टळला असता हिंसाचार
2 अप्रिय घटना टाळण्यासाठी औरंगाबाद शहरात जमावबंदी लागू
3 विवाहसोहळयावरुन परतताना कारला भीषण अपघात, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
Just Now!
X