21 September 2020

News Flash

जेजे रुग्णालयातून आरोपीचे पलायन

जेजे मार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून कै द्याचा शोध सुरू के ला आहे.

संग्रहित छायाचित्र

 

मुंबई : कल्याण कारागृहात शिक्षा भोगणारा कै दी सुरक्षेसाठी तैनात पोलिसांच्या हातावर तुरी देत बुधवारी जेजे रुग्णालयातून पसार झाला. जेजे मार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून कै द्याचा शोध सुरू के ला आहे. घरफोडीसह अन्य गुन्ह्य़ांमधील आरोपी सुशील वाल्मीकी (२८) कल्याणच्या आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत होता. कर्करोगाची लक्षणे आढळल्याने त्याला कारागृहातून जेजे रुग्णालयात चाचण्या व उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. सुशील पळून जाऊ नये यासाठी कारागृहाच्या चार शिपायांचे पथक दोन पाळ्यांमध्ये जेजे रुग्णालयात तैनात होते. बुधवारी सकाळी रात्रपाळीतील पोलीस पथक घरी निघण्याच्या तयारीत असताना सुशीलने नैसर्गिक विधी आटोपण्याचा बहाणा करून स्वच्छतागृहाकडे गेला आणि नजर चुकवून पसार झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 3:15 am

Web Title: accused escapes from jj hospital akp 94
Next Stories
1 वाहतूकबंदीच्या काळात सेकंडहॅण्ड दुचाकींना गिऱ्हाईक!
2 महापालिकेचे कामकाज ठप्प
3 १२१ तासांचे ऑनलाइन कवीसंमेलन
Just Now!
X