डोंगरी येथे चार मजली अवैध इमारत कोसळून झालेल्या अपघाताला जबाबदार धरत पोलिसांनी बाई हिराबाई राहिमबाई अलू पारू अँड बाई केसरबाई धारमसी खाकू चॅरिटेबल अँड रिलीजस ट्रस्टचे विश्वस्त आणि बांधकाम ठेकेदाराविरोधात सोमवारी गुन्हा नोंदवला.

या अपघातात १३ जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले होते. पोलीस चौकशीत ही इमारत केसरबाई इमारतीच्या मोकळ्या आवारात अवैधरित्या बांधण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अवैध इमारतीला संरक्षण, अभय देणाऱ्या संबंधित पालिका, म्हाडा अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाईल.