27 November 2020

News Flash

पोलिसांना विजेचा झटका देऊन आरोपीचे पलायन

या प्रकरणी पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

ट्रॉम्बे परिसरात वास्तव्यास असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस शुक्रवारी त्याच्या घरी गेले, मात्र पोलिसांना विजेचा झटका देऊन आरोपीने पळ काढला. या प्रकरणी पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेत आहेत.

ट्रॉम्बे येथील चित्ताकॅम्प परिसरात राहणाऱ्या अब्दुल करीम ऊर्फ दुबई अक्रम (२७) या आरोपीवर मारहाण, लूट, चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी अब्दुल घरी आल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. मात्र त्याची कुणकुण लागताच अब्दुलने पोलिसांपासून सुटका करून घेण्यासाठी दरवाजाच्या कडीला विजेची वायर जोडली आणि विद्युतप्रवाह सुरू केला.

एका पोलिसाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याला विजेचा झटका बसला. तरीही पोलिसांनी दरवाजा तोडला. मात्र अब्दुलने घराचा पत्रा तोडून पलायन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:18 am

Web Title: accused fled after giving an electric shock to the police abn 97
Next Stories
1 सांताक्रूझमध्ये छेड काढल्याप्रकरणी तरुणाची हत्या
2 गावाहून परतलेल्यांचीही तपासणी
3 राज्यात निर्बंध लागू करण्याचा विचार
Just Now!
X