News Flash

चुलत्यावर अ‍ॅसिड हल्ला

कौटुंबिक वादातून २७ वर्षीय पुतण्याने आपल्या ४९ वर्षीय चुलत्याच्या चेहेऱ्यावर अ‍ॅसिड फेकून नंतर त्याच्यावर हातोडय़ाने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री अंधेरी येथे घडली. हल्लेखोरास पोलिसांनी

| February 25, 2013 02:43 am

कौटुंबिक वादातून २७ वर्षीय पुतण्याने आपल्या ४९ वर्षीय चुलत्याच्या चेहेऱ्यावर अ‍ॅसिड फेकून नंतर त्याच्यावर हातोडय़ाने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री अंधेरी येथे घडली. हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली असून हल्ल्याचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत.
अंधेरी येथे खाद्यपदार्थांचा स्टॉल चालविणारे राजिंदर सिंग आपला पुतण्या सरबजित याच्यासोबत राहत होते. सरबजित बेरोजगार आहे. आपला काका स्टॉल हडप करेल व आपल्याला कोणताही वाटा देणार नाही, असा सरबजितला संशय होता. त्यावरूनही वाद होत असत. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काका-पुतण्यात वाद झाला आणि संतप्त झालेल्या सरबजितने काकाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. वेदनेने कळवळत असलेल्या काकावर त्याने हातोडय़ाने हल्ला केला. त्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. राजिंदर सिंग यांना अंधेरीच्या सेव्हन हिल इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले असून सरबजितने नेमका हल्ला का केला याचा तपास पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:43 am

Web Title: acid attack on uncle
Next Stories
1 पश्चिम- मध्य रेल्वेवरील दोन फाटक बंद
2 बबन मिंडे यांच्या ‘कॉमन मॅन’ला सुभाष भेंडे पुरस्कार
3 विवेकानंद विचारांवर शिकागोत संमेलन व्हावे- अडवाणी
Just Now!
X