News Flash

१२ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

या कारवाईमुळे हेरॉईनची वितरण-विक्री साखळी उद्ध्वस्त करण्यात पथकाने यश मिळवले.

प्रतिनिधिक छायाचित्र

 

राजस्थानहून मुंबईत आलेले १२ कोटींचे ‘हेरॉईन’ अमली पदार्थ विरोधी पथकाने हस्तगत केले. हा साठा मुंबईसह अन्य राज्यांत वितरित करणारे राजेश जोशी (५०), मुत्तुस्वामी कवांदर (४२) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखालील प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे आणि पथक गेल्या सहा महिन्यांपासून ‘हेरॉईन’च्या या बडय़ा वितरकांच्या मागावर होते. या कारवाईमुळे हेरॉईनची वितरण-विक्री साखळी उद्ध्वस्त करण्यात पथकाने यश मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहरात होणारा ८० टक्के हेरॉईन व्यापार जोशी, मुत्तुस्वामीच्या नियंत्रणात होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:55 am

Web Title: acquiring addictive substances abn 97
Next Stories
1 खातेवाटपानंतरही मंत्र्यांमध्ये खदखद!
2 टाटा समूहात परतण्यात स्वारस्य नाही!
3 एकनाथ शिंदेंना विशेष स्थान, परब यांच्यावर विश्वास
Just Now!
X