मुंबईत कमाल नागरी जमीन धारणा कायद्याअंतर्गत सरकारला सदनिका ताब्यात न दिलेल्या २३ बिल्डरांपैकी १४ जणांवर फौजदारी कारवाई करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून ती एक महिन्यात पूर्ण करून कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांनी बुधवारी विधानपरिषदेत केले.
या बिल्डरांनी शासनाला सदनिका न देता त्या परस्पर विकल्या. त्यामुळे रेडी रेकनर दराने किंमत वसुलीचा निर्णय होवूनही ते झाले नसल्याचे विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, अ‍ॅड. आशिष शेलार यांनी निदर्शनास आणले. बिल्डरांविरोधात मालाड, वर्सोवा आदी पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत दोन कोटी ६६ लाख रूपये वसूल केल्याची माहिती अहीर यांनी दिली.