उल्हासनगर जवळील वडोल गाव परिसरातील वालधुनी नदीत घातक रसायन ओतून स्थानिक रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या टँकरचालकांविरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला.
वडोल गावाजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीत काही टँकर चालकांनी घातक रसायन ओतले. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मळमळणे, उलटय़ा होणे, श्वसनास त्रास होणे, डोके गरगरणे असे प्रकार सुरू झाले. सरकारी, खासगी रूग्णालयात विषारी वायुने बाधीत रूग्णांची संख्या  १२५ झाली.  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण विभागाचे  अधिकारी भगवान सोळंखुे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.