News Flash

करबुडव्या मुंबईकरांवर कारवाई

३,३९२ मालमत्ताधारकांवर बडगा, घरातील वस्तूही जप्त

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात घसरण झाल्यामुळे प्रशासनाने करबुडव्या मुंबईकरांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून तब्बल ३,३९२ मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात आली.

सुमारे १,३७६ कोटी रुपये कर थकविणाऱ्या ३,१७९ मुंबईकरांच्या मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली, तर २६९ कोटी रुपये कर थकविणाऱ्या २१३ मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे. कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुमेर बिल्डरच्या रे रोड येथील कार्यालयातील लॅपटॉप, संगणकासह अन्य साहित्य जप्त करून तेथील आरएमसी प्लान्टला टाळे ठोकण्यात आले.

मुंबईमध्ये सुमारे चार लाख ५० हजार मालमत्ताधारक असून एक लाख २७ हजारांपेक्षा अधिक निवासी, ६७ हजारांपेक्षा अधिक व्यावसायिक, सहा हजारांहून अधिक औद्योगिक, १२ हजार १५६ भूभाग आणि इतर प्रकारच्या मालमत्तांचा त्यात समावेश आहे.

या मालमत्ताधारकांकडून २०१९-२० या आर्थिक वर्षांत पाच हजार ४०० कोटी रुपये मालमत्ता कर मिळणे अपेक्षित होते. गेल्या आठवडय़ापर्यंत यापैकी तीन हजार १५४ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला.

साडेतीनशे कोटी जमा

चालू आर्थिक वर्षांतील कर वसुलीचे उद्दिष्टय़ साध्य करण्यात अपयशी ठरलेल्या पालिकेने अखेर गेल्या आठवडय़ापासून थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेल्या आठवडय़ात थकबाकीदारांनी पालिकेच्या तिजोरीत सुमारे ३५० कोटी रुपये कर जमा केला.

मात्र अद्यापही अनेक थकबाकीदारांनी कर भरणा केलेला नाही. त्यामुळे थकबाकीदारांच्या घरातील किंवा कार्यालयातील वस्तू जप्त करण्यात येत आहे. संबंधितांचे चारचाकी वाहन, फर्निचर, टीव्ही, रेफ्रीजरेटर, वातानुकूलित यंत्रणा यांसारखी चल संपत्ती जप्त करण्यात येत आहे. पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने शनिवारी धडक कारवाई करीत थकबाकीदारांच्या मालमत्तांमधील विविध वस्तू जप्त करण्याचा सपाटा लावला होता. ही कारवाई पालिकेच्या ई विभाग कार्यालयाने केली.

* रे रोड परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीशी संबंधित सुमेर बिल्डरच्या कार्यालयातील लॅपटॉप, संगणक, प्रिंटर, खुच्र्या, टेबल, मायक्रोवेव्ह ओव्हन आदी वस्तू जप्त करण्यात आल्या. तसेच बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीशी संबंधित आरएमसी प्लान्टला बंद केला

* थकबाकीदारांच्या घरातील किंवा कार्यालयातील वस्तू जप्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 12:36 am

Web Title: action against tax deductions mumbaikar abn 97
Next Stories
1 परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
2 मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश
3  ‘करोना’सारख्या साथींच्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात नियंत्रण संस्था स्थापणार
Just Now!
X