करोनाबाबत अफवा पसरवून नागरिकांमध्ये संभ्रम, दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी आघाडी उघडली आहे. समाजमाध्यमांवरून अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांना अटक करण्यात येत आहे. या कारवाईत मुंबई वगळता उर्वरित राज्यात ३६ गुन्ह्य़ांची नोंद करण्यात आली.सायबर महाराष्ट्रच्या राज्यातील प्रत्येक केंद्राने व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टिकटॉक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, चुकीची माहिती किंवा संदर्भ, भाकिते पसरविणाऱ्यांचा शोध घेत ३६ गुन्हे नोंदवले. त्यात बीड आणि सातारामध्ये सर्वाधिक पाच गुन्ह्यांची नोंद झाली. करोनाबाबत समाजमाध्यमांवर प्राप्त मजकूर, छायाचित्र, ध्वनिचित्रफितीची खातरजमा केल्याशिवाय पसरवू नये. मुंबईत करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची चुकीची माहिती पसरवणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात अंधेरीच्या डी.एन. नगर पोलीस ठाण्यात अजामीनपात्र कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 30, 2020 12:47 am