ठाण्यापाठोपाठ मुंबईतही कारवाईची चिन्हे

ठाणे महापालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरून अनधिकृत फेरीवाल्यांना दणका दिल्यानंतर आता मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक तीव्र करण्याची तयारी मुंबई महापालिका करीत असल्याचे समजते. पादचाऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या आणि विशिष्ट वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी घेऊन अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या, तसेच पदपथावर पसारा वाढविणाऱ्या दक्षिण मुंबईमधील फॅशन स्ट्रीटवरील फेरीवाल्यांवर पहिल्या टप्प्यात कारवाई करण्यात येणार असून त्याची तयारी मुंबई महापालिकेने सुरू केली आहे. नोटीस बजावूनही पदपथावरील आपला पसारा आवरता न घेणाऱ्या ४० फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची तयारीही मुंबई महापालिका करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Asked not to ride a motorcycle after suffering a brain stroke, Kolkata man’s cycle now gets all the attention
ब्रेन स्ट्रोकमुळे व्यक्तीला बाईक चालवण्यास केली मनाई! बाईकवेड्याने सायकलची बनवली बाईक! पाहा Viral Video
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरून पदपथ अडविले आहेत. त्यामुळे पदपथावरून पादचाऱ्यांना चालणे अवघड बनले आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. कारवाईनंतर पुन्हा फेरीवाले पदपथावर पथाऱ्या पसरत आहेत. त्यामुळे आता मुंबईमध्ये फेरीवाल्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्याचे समजते.

मुंबईकरांना परिचित असलेल्या दक्षिण मुंबईमधील महात्मा गांधी मार्गावरील ‘फॅशन स्ट्रीट’वर कपडे खरेदीसाठी कायम वर्दळ असते. आसपासच्या परिसरातील पदपथ मोकळे करण्यासाठी काही वर्षांपूर्वी तेथील फेरीवाल्यांना महात्मा गांधी मार्गावर स्थलांतरित करण्यात आले होते. अल्पावधीतच महात्मा गांधी रोड फॅशन स्ट्रीट नावाने ओळखला जाऊ लागला. फॅशन स्ट्रीटवर २०१० पूर्वी परवानाधारक ३९४ फेरीवाले होते. येथील फेरीवाल्यांना चप्पल निर्मिती – दुरुस्ती, पान-वीडीचा स्टॉल्स आदी विविध व्यवसाय करण्यासाठी पालिकेकडून परवाने देण्यात आले होते. मात्र काही फेरीवाले परवान्यातील अटी व शर्थीचा भंग करुन वेगळ्याच वस्तूंची विक्री करीत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पालिकेने २०१० मध्ये नोटीस बजावून ३९ जणांचे  परवाने रद्द केले होते. मात्र अनेक फेरीवाल्यांकडून आजही अटी आणि शर्थीचा भंग होत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या काही महिन्यांपूर्वी निदर्शनास आले होते.

विशिष्ट व्यवसायासाठी परवाना दिलेला असताना काही जण तयार कपडय़ांची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या  फेरीवाल्यांना १.५ मीटर बाय १.५ मीटर जागा देण्यात आली असून त्यापुढील पदपथावरील मोकळ्या जागेत लोखंडी व लाकडी बांबूच्या साह्य़ाने स्टॅण्ड बनवून त्यावर विक्रीसाठी कपडे टांगण्यात येत आहेत. पदपथावर अतिक्रमण करून वस्तू विक्रीला ठेवल्या जात आहेत. परवानाधारक फेरीवाला स्टॉलजवळ कधीच उपलब्ध होत नसून काही स्टॉल्स चालवायला देण्यात आले आहेत, तर काही स्टॉल्सचा कारभार परवानाधारकाचे कामगार पाहात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले.

पदपथावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांना विक्रेत्यांकडून नाहक त्रास दिला जात असून त्यामुळे पादचारी या पदपथावरुन जाण्यास नाखुष असतात. फेरीवाल्यांच्या उपद्रवाबाबत स्थानिक रहिवाशी संघटनांनी काही महिन्यांपूर्वी पालिकेकडे तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेत पालिकेने जानेवारीमध्ये ५४ फेरीवाल्यांवर नोटीसही बजावली होती. कारवाई होईल या भीतीने काही दिवस फेरीवाल्यांनी पदपथावरील पसारा आवरता घेतला होता. मात्र आता पुन्हा त्यांनी दुकानासमोरील पदपथाचा वापर कपडे विक्रीसाठी सुरू केला आहे. या प्रकरणाची देखल घेत पालिकेने ४० फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

या आधी काय झाले?

  • फॅशन स्ट्रीटवर सन २०१० पूर्वी परवानाधारक ३९४ फेरीवाले.
  • त्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी पालिकेकडून परवाने. मात्र काही फेरीवाले परवान्यातील अटी व शर्थीचा भंग करुन वेगळ्याच वस्तूंची विक्री करीत असल्याचे उघड.
  • सन २०१०मध्ये नोटीस बजावून ३९ जणांचे परवाने रद्द.