मुंबई : करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्धची कारवाई तीव्र करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरुद्धची रेल्वेच्या हद्दीतील कारवाई थंडावली असून रेल्वे प्रवासादरम्यान मुखपट्टीविना फिरणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पश्चिम रेल्वे आणि पालिके ने ऑगस्टमध्ये रेल्वेच्या हद्दीत मुखपट्टीविना फिरणाऱ्या के वळ एक हजार ८१६ जणांवर कारवाई के ली आहे. तर रेल्वे कायद्यानुसार मध्य रेल्वेने त्यांच्या हद्दीत मुखपट्टीविना फिरणाऱ्या के वळ २८० जणांविरुद्ध कारवाई के ली आहे. एप्रिलच्या तुलनेत ऑगस्टमधील कारवाईचे प्रमाण घसरले आहे.

करोनापासून बचाव करण्यासाठी मुखपट्टी आणि सॅनिटायझरचा वापर करणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना असतानाही अनेक प्रवासी मुखपट्टीशिवाय लोकल प्रवास करीत आहेत. काही जण मुखपट्टी हनुवटीवर ठेवून, तर काही प्रवाशांची मुखपट्टी खिशात वा हातात दिसते. त्यामुळे अन्य प्रवाशांना करोना संसर्गाचा धोका निर्माण होतो. अशा प्रवाशांवर मुंबई पालिके कडून रेल्वे हद्दीत कारवाई के ली जात आहे. तर ही कारवाई करण्याचे अधिकार एप्रिलमध्ये रेल्वेलाही देण्यात आले. त्यानुसार जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत दंड वसूल करावे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पालिका व रेल्वेने के लेल्या कारवाईत एप्रिल महिन्यात मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या दोन हजार ६४६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात एक हजार ८१६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तर रेल्वे कायद्यानुसार एप्रिलमध्ये ४४६ विनामुखपट्टी प्रवासी जाळ्यात अडकल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. ऑगस्टमध्ये हीच संख्या २८० आहे. गेल्या पाच महिन्यांत रेल्वे कायद्यानुसार मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या एकू ण दोन हजार ४९ प्रवाशांवर कारवाई करताना तीन लाख ९७ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर पश्चिम रेल्वे आणि पालिकेने नऊ हजार ५९९ प्रवाशांवर कारवाई करताना सुमारे १२ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल के ला.