राज्य माहिती आयोगाच्या आदेशाचे शासन किंवा शासनाच्या अधिपत्याखालील कार्यालयांकडूनच पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयोगाने दिलेला आदेश किंवा निर्णयाचे पालन करण्यास कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केला.
केंद्रीय माहिती अधिकार कायद्यातील कलम १८(३) नुसार राज्य माहिती आयोगाला दिवाणी न्यायाधीशांचे अधिकार देणार आले आहेत. त्यानुसार कारवाई करम्याचे आदेश देण्यात आले आहेत.