संघ कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर सेन्सॉर बोर्डाचा निर्णय

मुंबई : ‘मुंबई सागा’ या चित्रपटातील एका दृश्यावर सेन्सॉर बोर्डाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चित्रण असलेले दृश्य आणि संवाद हे मानहानीकारक असून त्यामुळे संघाबद्दल चुकीचा संदेश लोकांमध्ये जात असल्याचा आक्षेप संघाचे स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी घेतला होता.

या चित्रपटातील संबंधित प्रसंग आणि संवाद काढून टाकण्यात यावेत. तसेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी भिंगार्डे यांनी कायदेशीर नोटिशीद्वारे के ली होती. त्या नोटिशीला उत्तर देताना चित्रपटाचे निर्माते सुपर कॅ सेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि व्हाइट फीदर लिमिटेड यांनी आपली चूक  मान्य के ली.  सेन्सॉर बोर्डाने ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील संबंधित दृश्य अस्पष्ट (ब्लर) करून घेतले आहे.