News Flash

अभिनेता अबिर गोस्वामीचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू

बॉलिवूड अभिनेता अबिर गोस्वामीचा ट्रेडमिलवर व्यायामकरतेवेळी हृद्यविकाराच्या धक्क्क्यानं मृत्यू झाला. 'लक्ष्य', 'डरना मना है' या चित्रपटांमध्ये तसेच 'कुसूम', 'यहाँ मे घर घर खेली', 'हॉटेल किंग्जस्टन

| June 1, 2013 12:47 pm

बॉलिवूड अभिनेता अबिर गोस्वामीचा ट्रेडमिलवर व्यायाम करतेवेळी हृद्यविकाराच्या धक्क्क्यानं मृत्यू झाला. ‘लक्ष्य’, ‘डरना मना है’ या चित्रपटांमध्ये तसेच ‘कुसूम’, ‘यहाँ मे घर घर खेली’, ‘हॉटेल किंग्जस्टन’ आणि ‘प्यार का दर्द हे’ या टेलिव्हीजन मालिकांमध्ये अबिरने काम केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, अबिरला ट्रेडमिलवर व्यायाम करताना हृद्यविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला मालाड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, काही वेळाने त्याचा हृद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अबिरचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. २०१२ साली अबिरच्या हृद्यविकारावर शस्त्रक्रिया करुन निदान करण्यात आले होते. परंतु, तो पुर्णपणे बरा झाला नव्हता. अबिरचा मृत्यू झाल्याचे समजताच कुसूम कार्यक्रमातील त्याची सहकलाकार स्मिता सिंग म्हणाली, “अबिर आनंदी आणि भरपूर बोलक्या व्यक्तीमत्वाचा होता. ही घटना अतिशय धक्कादायक आणि दु:खद आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2013 12:47 pm

Web Title: actor abir goswami suffers heart attack on treadmill dies
Next Stories
1 अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी प्रीतीचे निधन
2 ‘अर्थगती’वर निराशेचे मळभ
3 ‘रेसकोर्स’ची जागा मिळणे कठीणच!
Just Now!
X