News Flash

अटकेत असलेला अभिनेता एजाज खान करोना पॉझिटिव्ह; NCB च्या अधिकाऱ्यांचीही होणार करोना चाचणी

३० मार्चला एजाजला अटक करण्यात आली

(फोटो सौजन्य: एएनआय)

बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानला मंगळवारी ३० मार्च रोजी ड्रग्ज प्रकरणात अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) विमानतळावरून ताब्यात घेतलं. त्यानंतर जवळपास आठ तास त्याची चौकशी करण्यात आली होती. मात्र आता एजाज खान करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. एजाज खानला उपचारासाठी एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र एजाज खान करोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला अटक करणाऱ्या तसेच चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांची चाचणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची करोना चाचणी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

एनसीबीने ३० मार्च रोजी एजाजला ताब्यात घेतल्यानंतर नियमांनुसार दोन दिवसांनी त्याची करोना चाचणी करण्यात आली होती. चार एप्रिल रोजी या चाचणीचा निकाल आल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. एजाजला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास असून सुरु आहे. एनसीबीकडून यासंदर्भात एजाजची सखोल चौकशी केली जात आहे. मात्र तो करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्याची चौकशी सध्या थांबवण्यात आली असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.

अंमली पदार्थांसंदर्भातील प्रकरणामध्ये एजाज खानसमोरील अडचणी वाढताना दिसत आहे. आधी त्याला तीन एप्रिलपर्यंत एनसीबीच्या ताब्यात देण्यात आलं होतं. त्यानंतर पाच एप्रिलपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुंबईतून एनसीबीनं शादाब बटाटा या ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींना तो ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर आलं होतं. शादाबच्या चौकशीतूनच अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर एजाज खानला अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आल्यानंतर एजाज खानने आपल्या घरी एनसीबीला केवळ चार झोपेच्या गोळ्या सापडल्याचा दावा केला होता. एएनआय वृत्तसंस्थेला एजाजने दिलेल्या माहितीनुसार, माझ्या पत्नीचा गर्भपात झाला असून ती डिप्रेशनमध्ये होते. त्यासाठी ती झोपेच्या गोळ्या घ्यायची. याच चार गोळ्या एनसीबीला सापडल्या आहेत, असं एजाजने म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 1:44 pm

Web Title: actor ajaz khan tested positive for covid 19 the ncb officer involved in this probe will also undergo covid test scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी अनिल देशमुख कायदा आणि राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत”
2 अनिल देशमुखांवरील आरोपांच्या सीबीआय चौकशीच्या आदेशावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….
3 अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
Just Now!
X