23 January 2021

News Flash

गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचं उद्या लग्न; ‘या’ अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ

लग्नासाठी मुंबई आणि पुणे पोलिसांकडून घेतली विशेष परवानगी

गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे उद्या (८ मे) लग्नगाठ बांधणार आहेत. २९ मार्च रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही. आता मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे दोघं उद्या विवाहबद्ध होणार आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “आम्ही लग्नाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज केला होता. मला मंगळवारी रात्री पोलिसांकडून परवानगीचा मेल आला. त्यानंतर लगेचच आम्ही ८ मे ही लग्नाची तारीख ठरवली. आम्ही लग्नाची शॉपिंग आधीच करून ठेवली होती. २९ मार्चला लग्न होईल या हिशोबाने आम्ही सगळी तयारी केली होती. त्यामुळे आता फार कष्ट करावे लागणार नाही.”

मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे. या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असंही अक्षयने सांगितलं. सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थितांना दिले जातील. योग्य वेळी धूमधडाक्यात रिसेप्शनचं आयोजन केलं जाईल अशीही माहिती त्याने दिली.

अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे. तसंच ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातही अक्षयनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. तर महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी योगिता काम करते. काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 11:29 am

Web Title: actor akshay waghmare to tie the knot with arun gawli daughter yogita on may 8 ssv 92
Next Stories
1 “चला एकत्र जाऊ आणि IFSC मुंबईतच झाले पाहिजे असं केंद्राला सांगू”; भाजपा नेत्याचे राज्य सरकारला आवाहन
2 मुंबईकरांच्या चिंतेत भर : पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण देशाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी जास्त
3 पालिकेकडून खासगी रुग्णालयांचा ताबा?
Just Now!
X