News Flash

गलत गलत गलत है!! कंगनाच्या कार्यालयावर हातोडा, अनुपम खेर म्हणाले…

अनुपम खेर एक संवेदनशील अभिनेते म्हणाले...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर आज हातोडा चालवण्यात आला. कंगनाचा थेट शिवसेनेबरोबर सामना सुरु आहे. कंगनाचे महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक द्वंद रंगले आहे. त्यातून आज मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या जुहू कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या या कारवाईनंतर राजकीय आणि कला क्षेत्रातून वेगवेगळया प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या या कारवाईचा निषेध केलेला असताना आता बॉलिवूडमधून अनुपम खेर यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केले आहे.

आणखी वाचा- मुंबईत पोहोचताच कंगनाची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत म्हणाली…

अनुपम खेर हे संवेदनशील अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी तशाच आशयाचे टि्वटही केले आहे. “कोणाचे घर इतक्या निर्दयीपणे तोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. याचा सर्वाधिक प्रभाव कंगनाच्या घरावर नाही, तर मुंबईच्या जमीन आणि आत्म्यावर होणार आहे” असे अनुपम खेर यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. कंगनाने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकणात निष्पक्ष तपासासाठी आवाज उठवताना बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरही सडकून टीका केली होती.

आणखी वाचा- “…मगर याद रख बाबर, यह मंदिर फिर बनेगा”, कंगनाने केलं सूचक ट्विट

या कारवाईनंतर कंगनाने “उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल” असं व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कंगनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 6:14 pm

Web Title: actor anupam khera has condemned the demolition of kanganas office dmp 82
Next Stories
1 “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली
2 … म्हणून कुशल बद्रिकेने केलं वैभव मांगलेंचं कौतुक
3 एकता कपूरच्या घरावर दगडफेक; वेब सीरिजमधील त्या सीनमुळे प्रेक्षक संतापले
Just Now!
X