News Flash

अभिनेता एजाज खानला अटक, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

अभितेना एजाज खानला अटक करण्यात आली आहे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता एजाज खानला बेलापूरमधून अटक करण्यात आली आहे. बेलापूरमधील के स्टॉर हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली असून अमली पदार्थ विरोधी नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एजाजला ड्रग्स प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या एजाजची पोलीस चौकशी करत असून दुपारी दोन वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बेलापूरमधील के स्टार हॉटेलमध्ये एका व्यक्तीकडे अमली पदार्थ असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी के स्टार हॉटेलवर धाड टाकली. यावेळी हॉटेलमध्ये अभिनेता एजाज खानजवळच Ecstasy या अमली पदार्थाच्या गोळ्या सापडल्या. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने तात्काळ एजाजला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.

एजाजकडे Ecstasy या गोळ्या सापडल्या असून तो केवळ नशा करण्यासाठी या गोळ्यांचा वापर करतो की त्यांचे वितरणही करतो याचा तपास सुरु असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी दिली. तपास झाल्यानंतर एजाजला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, बिग बॉस या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या माध्यमातून एजाज प्रसिद्धीझोतात आला होता. त्याने ‘रक्तचरित्र’, ‘नायक’ आणि ‘रब जैसी कई’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यासोबतच ‘बिग बॉस’च्या सातव्या सीजनसहित ‘करम अपना अपना’, ‘कहानी हमारे महाभारत की’ आणि ‘रहे तेरा’ आशिर्वाद सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 11:19 am

Web Title: actor ejaj khan arrested belapur
Next Stories
1 ‘#MeToo मोहिमेने पितृसत्ता संस्कृतीला धक्का दिला, पुढील लढाई आणखी कठीण’
2 दीप-वीरच्या लग्नात ‘या’ कलाकारांची खास उपस्थिती
3 #MeToo : वैयक्तिक वादातून माझ्यावर आरोप, विकास बहलचं ‘IFTDA’ च्या नोटिशीला उत्तर
Just Now!
X