25 September 2020

News Flash

मेट्रोसाठी वृक्षतोडीला जॉन अब्राहमचा विरोध

ट्रेलर रिलिजदरम्यान मेट्रोसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर त्याने आपले मत व्यक्त केले.

मेट्रो 3 च्या कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार आहे. दरम्यान, मेट्रो 3 च्या कारशेडसाठी 33 हेक्टरवरील झाडे तोडण्याचा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे मत अभिनेता जॉन अब्राहम याने व्यक्त केले आहे. बाटला हाऊस चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलिज करण्यात आला. या ट्रेलर रिलिजदरम्यान मेट्रोसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर आपले मत व्यक्त केले.

मेट्रोच्या कारशेडसाठी सरकारने 33 हेक्टरवर पसरलेली वनराई नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. झाडांच्या कत्तल तसेच नव्याने होणार कोस्टल रोड यालाही माझा विरोध आहे, असे जॉन यावेळी म्हणाला. त्यामुळे आपण कोणत्या दिशेने जात आहोत, असा सवालही त्याने यावेळी केला. तसेच आपण पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यात मागे पडत आहोत. पावसाच्या कोसळणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाण्याची कमतरता भासणार नाही, असेही तो म्हणाला.

सध्या पर्जन्यमान सुधारण्याची गरज आहे. ते न सुधारल्यास येत्या काही वर्षांमध्ये सर्व नद्या आटून जातील. तसेच भविष्यकाळात परिस्थिती अधिक बिकट होईल, असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. अभिनेता जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तसेच नुकतीच जॉनने त्याच्या नव्या चित्रपटाचीही घोषणा केली आहे. हा चित्रपट अॅक्शन- थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अटॅक’ असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 4:58 pm

Web Title: actor john abraham trailer release opposes mumbai metro 3 coastal road tree cutting jud 87
Next Stories
1 नवाबसाठी पूजा ठरली लकी, मिळाली या चित्रपटात झळकण्याची संधी
2 Web Series : सायली संजीव, ओमप्रकाश शिंदे घेणार प्रेमाचा ‘यू टर्न’
3 जॉन अब्राहम घेऊन येतोय एक नवा थरारपट
Just Now!
X