मानव कौल आणि आनंद तिवारी या दोन अभिनेत्यांना सिनेमाच्या शुटींग दरम्यान करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अभिनेता अर्जुन रामपाल याला होम क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. अभिनेता अर्जुन रामपालने यासंदर्भात एक ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. अर्जुन रामपाल, मानव कौल आणि आनंद तिवारी हे तिघेजण नेल पॉलिश या सिनेमाचं शुटिंग करत होते. यावेळी दोन अभिनेत्यांना करोना झाल्याची माहिती अर्जुन रामपालने ट्विट करुन दिली आहे.

नेल पॉलिश सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी एकाच वेळी मानव कौल आणि आनंद तिवारी या दोन अभिनेत्यांना करोना झाला. आपल्या दोन सह अभिनेत्यांना करोना झाल्याचं अर्जुन रामपालने सांगितलं आहे. नेल पॉलिश सिनेमाच्या सेटवर मानव आणि आनंद या दोघांना करोना झाला. आम्ही सिनेमाचं शुटिंग तातडीने थांबवलं आहे. सगळेजण आराम करत आहेत मी माझ्या घरात क्वारंटाइन झालो आहे. या आशयाचं ट्विट अर्जुन रामपालने केलं आहे.

‘आई माझी काळूबाई’ आणि ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतल्या कलाकारांनाही करोनाची बाधा झाली. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत काम करणाऱ्या आशालता वाबगावकर यांचं करोनामुळे निधन झालं. तर ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या निवेदिता सराफ यांनाही करोनाची बाधा झाली. निवेदिता सराफ यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे त्या होम क्वारंटाइन आहेत. निवेदिता सराफ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मालिकेतल्या इतर कलाकारांचीही कोविड टेस्ट झाली. या दोन घटना ताज्या असतानाच आता ‘नेल पॉलिश’ या हिंदी सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेता मानव कौल आणि आनंद तिवारी या दोघांना करोनाची बाधा झाली. त्यानंतर अभिनेता अर्जुन रामपाल याने स्वतःला होम क्वारंटाइन करुन घेतले आहे. आपला घरातला फोटोही त्याने ट्विट केला आहे.