22 September 2020

News Flash

संजय दत्तला पुन्हा पॅरोल मंजूर;२१ मार्चपर्यंत तुरुंगाबाहेर

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी आणि अभिनेता संजय दत्त याच्या पॅरोलमध्ये मंगळवारी आणखी एक महिन्याची वाढ करण्यात आली.

| February 18, 2014 05:59 am

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी आणि अभिनेता संजय दत्त याच्या पॅरोलमध्ये मंगळवारी आणखी एक महिन्याची वाढ करण्यात आली. पत्नी मान्यताच्या आजारपणामुले पॅरोलमध्ये वाढ करण्याची मागणी संजय दत्त याने राज्य सरकारकडे केली होती. ती मंजूर करण्यात आली. संजय दत्तला २१ मार्चपर्यंत पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी गेल्या वर्षी येरवडा तुरुंगात दाखल झाल्यापासून संजय दत्त सातत्याने तुरुंगाबाहेर राहात आहे. सुरुवातीला फर्लो आणि नंतर पॅरोल या दोन रजांचा वापर करून संजय दत्त सुमारे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगाबाहेर आहे. मान्यताच्या आजारपणाच्या कारणामुळे संजय दत्तने पॅरोलमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. संजय दत्तला अद्याप एकूण साडेतीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगायची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 5:59 am

Web Title: actor sanjay dutts parol extended till 21 march
टॅग Sanjay Dutt
Next Stories
1 पालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून उद्योग,शेतीसाठी पुनर्वापर
2 मुख्यमंत्री रिक्षाचालकांच्या जीवावर उठलेत : राव
3 देशी मद्यविक्रीतून निवडणूक निधी ?
Just Now!
X