16 January 2021

News Flash

बीएमसीच्या नोटीशीविरोधात अभिनेता सोनू सूदची हायकोर्टात धाव

अनधिकृत बांधकामप्रकरणी याचिकेवर सोमवारी होणार सुनावणी

मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी बजावलेल्या नोटीशी विरोधात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने हायकोर्टात धाव घेतली आहे. सोनूने गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, आपण सहा मजली शक्तीसागर भवनमध्ये कोणतंही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही. हायकोर्टात या याचिकेवर सोमवारी न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार आहे.

सोनू सूदचे वकील अॅड. डी. पी. सिंह यांनी म्हटलं की, “याचिकाकर्त्यांनी इमारतीमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. केवळ महाराष्ट्र प्रदेश आणि नगरविकास कायद्यांतर्गत परवानगी असलेलाच बदल करण्यात आला आहे.”

याचिकेत म्हटलं की, कोर्टाने बीएमसीद्वारे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पाठवलेली नोटीस फेटाळून लावली. तसेच सोनू विरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश देत अंतरिम दिलासा दिला होता. गेल्यावर्षी बीएमसीकडून नोटीस मिळाल्यानंतर सोनूने दिवाणी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या कोर्टात दिलासा मिळू न शकल्याने त्याने हायकोर्टात अपील केलं होतं.

बीएमसीने गेल्या सोमवारी जुहू पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये सोनू सूदविरोधात कथीत स्वरुपात निवासी संकुलात विनापरवानगी हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. बीएमसीने या इमारतीचे निरिक्षण केल्यानंतर पोलिसांना तक्रार अर्ज पाठवला होता तसेच यात आढळून आलं होतं की, सोनूने कथीत स्वरुपात नियमांचे पालन केले नाही. तसेच गेल्यावर्षी सात ऑक्टोबर रोजी नोटीस दिल्यानंतरही अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवलं होतं.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल केलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 2:19 pm

Web Title: actor sonu sood moves bombay hc against bmc notice for illegal construction aau 85
Next Stories
1 Coronavirus : मुंबईत दिवसभरात ५९५ जणांना करोना संसर्ग
2 महाविद्यालयांबाबत २० जानेवारीपर्यंत निर्णय -सामंत
3 एसटीची स्वच्छता मोहीम
Just Now!
X