News Flash

अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून दोन वर्ष केला बलात्कार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे

वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी आयुष तिवारीविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. आयुषने या पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं या अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटल्याचं  ‘न्यूज18’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

लग्नाचं आमिष दाखवून आयुषने पीडित अभिनेत्रीवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर पीडिता गर्भवती राहिली. मात्र, आयुषने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या अभिनेत्रीने पोलिसांकडे धाव घेत आयुषविरोधात तक्रार दाखल केली आहे. २५ नोव्हेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात आयुष विरोधात तक्रार दाखल झाली असून त्याच्यावर कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे.

दरम्यान, आयुषने या पीडित अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर दोन वर्ष बलात्कार केला. मात्र, ऐनवेळी त्याने लग्न करण्यास नकार दिला, अशी माहिती वर्सोवा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या अभिनेत्री काही वेब सीरिजमध्ये काम केलं असून या घटनेनंतर कलाविश्वात पुन्हा एक खळबळ उडाल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 10:22 am

Web Title: actress accuses casting director ayush tiwari of rape case registered in varsova police mumbai ssj 93
Next Stories
1 नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी चुरस
2 दंडात्मक कारवाईनंतर मुंबई पालिकेकडून मुखपट्टी भेट
3 घरोघरी जाऊन क्षय, कुष्ठरुग्णांचा शोध